अक्कलकोट – अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दहा गावांसाठी ग्रामस्तरावरील दैनंदिन कारभारातील सुसूत्रता आणण्यासाठी त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालये बांधण्यासाठी एकूण दोन कोटी 15 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या नवीन बांधकामांसाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, जसे की एकूण पाच तलाठी कार्यालये व पाच मंडळ अधिकारी कार्यालये यासाठी दोन कोटी 15 लाख रुपये देण्यात आले आहेत.
महसुली व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या बांधकामांना शासनाकडून प्राधान्य दिले जात असून, त्यासाठी दोन कोटी 15 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 यातील नियोजन निधीतून मंजूर करण्यात आले आहेत.
गावाची नावे आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे
मंडळ अधिकारी कार्यालये
किणी, वागदरी, वळसंग, मैंदर्गी आणि मुस्ती या पाच गावांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आली आहेत.
तलाठी कार्यालये बांधकाम निधी
धोत्री, हालहळी (अ),कडबगाव, मुस्ती आणि खैराट या पाच गावांसाठी प्रत्येकी 18 लाख रुपये मंजूर करण्यात आली आहेत.
सचिन कल्याणशेट्टी आमदार, अक्कलकोट
या निधीमुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसाठी आधुनिक कार्यालये आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत, ज्यामुळे महसुली कामांना गती मिळेल असा विश्वास आहे. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभले आहे.



























