मंगळवेढा – गुंजेगाव-आंधळगाव जाणार्या मार्गावर एका चारचाकी मालवाहू वाहनाने भरधाव वेगात येवून रस्ता क्रॉस करीत असताना मोटर सायकल स्वारास जोराची पाठीमागून धडक दिल्याने मोटर सायकलवरील इकबाल मुलाणी (वय 50 वर्षे) व विघ्नेश पाटील (वय 21 वर्षे) गंभीर जखमी होवून दोघे मयत झाले. या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहन चालक संतोष शिवाजी देवकते (रा.तावशी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहित अशी,यातील फिर्यादी सतिश रेड्डी (रा.गुंजेगाव) दि.23 रोजी दुपारी 3.30 वाजता जात असताना त्यांच्या मामाचा मुलगा विघ्नेश पाटील आंधळगावहून गुंजेगावकडे येत असताना बसवेश्वर जांभळे यांच्या शेताजवळ आल्यावर फिर्यादीच्या मामाचा मुलगा विघ्नेश पाटील (वय 21 वर्षे) हा हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एम.एच.45 ए.आर.1463 वरुन गावाकडे येताना मोटर सायकलवर पाठीमागे बसलेला मित्र इकबाल मुलाणी असे दोघे रस्ता क्रॉस करीत असताना चारचाकी मालवाहतूक वाहन क्रमांक एम.एच.13 ई.पी.1081 या नंबरच्या वाहनाने भरधाव वेगात येवून जोराची धडक दिल्याने इकबाल याच्या उजव्या पायास,छातीस व अन्य ठिकाणी मार लागल्याने ते मृत झाले.
जखमी विघ्नेश पाटील व मयत इकबाल मुलाणी यास सांगोला येथील हॉस्पिटल मध्ये घेवून गेले. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन ते उपचारापुर्वी ते दोघे मयत झाले असलेबाबत सांगीतले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


















