सोलापूर : घरासमोर बसल्याच्या कारणातून मोदी येथे महिलेसह दोघांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला.
योगेश संजप्पा म्हेत्रे (वय 30) व आरती लक्ष्मण बरे (वय 28, दोघे रा. मोदी) असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. योगेश आणि आरती हे दोघे मोदी येथील भीमसिंग म्हेत्रे यांच्या घरासमोर बसले होते. तेव्हा आमच्या घरासमोर का बसला असे विचारून भीमसिंग व राजेश नरसिंग म्हेत्रे यांच्यासह इतर दोन जणांनी प्लॉस्टिक ट्रे व लाकडाने मारहाण केली. यात योगेशच्या डोक्याला जखम झाली तसेच आरती हिच्या सर्वांगास मार लागल्याने दोघे शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.