सोलापूर – 30 फूट खोल विहिरीमध्ये दोन घोणस साप साधारण तीन महिन्यापूर्वी कामती येथील जामगाव बुद्रुक येथे पडले होते. येथील शेतकरी तानाजी बेलछेत्रे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत दोन साप पडले होते. तानाजी यांचे चुलत बंधू विजयकुमार बेलछेत्रे यांच्याशी संपर्क केला. विजयकुमार यांनी WCAS चे सदस्य संतोष धाकपाडे यांना फोन करून माहिती दिली.
बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास WCAS चे सदस्य पोहचल्यानंतर त्या विहिरीमध्ये सदस्यांना ते साप दिसून आले. विहीर साधारण 30 फूट खोल आणि 50 फूट रुंद होती. साधारण तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या दोन घोणस प्रजाती सापांना विहिरी मधून बाहेर काढले. त्या दोन सापांना बाहेर काढल्यानंतर तानाजी बेलछेत्रे यांनी डब्ल्यूसीएएस टीमचे आभार मानले.
या बचाव कार्यात तानाजी बेलछेत्रे, संदीप बेलछेत्रे, तसेच डब्ल्यूसीएएसचे विकी चराटे, प्रवीण गावडे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केले.
























