मोहोळ : कॉलेजला येत असताना दुचाकीला आयचर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकी वरील दोन विद्यार्थीनिचा मृत्यू झाला ही घटना सकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास घडली
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहिती नुसार एम एच १३ इ एन ७०९५ वर प्रज्ञा धनाजी कोकाटे तांबोळे व तिची मैत्रीण स्नेहा काशिनाथ वाघमोडे नपिपरी या दोघी मोहोळ कडे कॉलेजला देण्यासाठी निघाल्या आयशर टेम्पो एम एच १३ ईपी1 ००१ ९ चा चालक राजीव आप्पांण्णा साळुंकी राहणार इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यास पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे
प्रज्ञा धनाजी कोकाटे इयत्ता अकरावी मधील नेताजी प्रशालेमध्ये शिकत होती घरची परिस्थिती साधारण वडील काबाडकष्ट करून त्यांची गुजरान करत आपली मुलगी कोणत्याही परिस्थिती शिकली पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवून दहावी पास झाल्यानंतर धनाजी कोकाटे शेतीतून उत्पन्न जास्त निघत नसल्याने मजुरी करून त्यांची पोटापाण्याचा प्रश्न सोडवत असलेतरीही आपली मुलगी शिकली पाहिजे तिला शिक्षण देता आलं पाहिजे किमान गॅजुएशन पर्यंत तरी आपण तिला शिकवलं पाहिजे हे उद्दिष्ट उराशी बाळगून प्रज्ञा ही दहावी पास झाल्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी मोहोळ येथीलनेताजी प्रशालेमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतले होते अभ्यासात ही प्रज्ञा चांगली हुशार होती तिला व्यवस्थितपणे अभ्यास करता यावा व कॉलेज पूर्ण करता यावं म्हणून तिच्या वडिलांनी मोटरसायकल घेतली होती व ती तिच्या मोटरसायकलवर कॉलेजला यायची नियमितपणे कॉलेजला व्यवस्थित आणि वेळेवर येणारी प्रज्ञा हिची नेहमीची येणारी मैत्रीण आली नसल्यामुळे ती एकटीच होती पिंपरी मध्ये राहणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे .ही मोहोळ येथे कन्या प्रशालेमध्ये शिकत होती तिचे वडीलही ड्रायव्हिंग व्यवसाय करणारे त्यांचीही परिस्थितीत जोमाची अशा परिस्थितीमध्ये मिळेल त्या वाहनाने ती मोहोळ यायची आणि कॉलेज पूर्ण करायचे अशा परिस्थितीमध्ये आज तिची नियमित असणारे आज तीची एसटी चुकली आणि प्रज्ञा ही एकटीच येत असल्याने स्नेहल ही तिला सोबत घेऊन मोहोळला निघाली.पिंपरीतून काही अंतर पुढे आल्यानंतर वळणावर भरधाव येणाऱ्या टेम्पो ने त्यांना जोराची धडक दिली .त्या उडून बाजूला पडल्या त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या झालं येणारे लोक जमा झाले पिंपरी गाव जवळ असल्यामुळे गावातील लोक ही आले
ॲम्बुलन्स बोलावण्यात आली त्यांनी तातडीने दोघींना मोहोळ येथील शासकीय रुग्णालयातदाखल केली परंतु दाखल करण्यापूर्वीचप्रज्ञाची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.स्नेहल वाघमोडे हेही गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले होते.परंतु ती सोलापूर येथील दवाखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि तिचाही दुर्दैव मृत्यू झाला. तांबोळे आणि पिंपरी दोन्ही गाव जवळ असल्याने दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही शाळेतील शिक्षक व नातेवाईकांनी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी केली होती.


























