मागील झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्यामुळे दोन तरुणांना लोखंडी रॉड आणि लाकडे बांबूने जबर मारहाण केल्याची घटना गेंट्याल टॉकीज इथं घडली आहे.
मागील भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून तरूणास लोखंडी रॉड लाकडी बांबूने मारहाण केल्याप्रकरणी 15 जणांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश अनिल मुदगल (वय 29, रा. कोंची कोरवी गल्ली, गेंट्याल टॉकीजजवळ, सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरुन विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव,माया जाधव, ध्रुव, जॅकी थोरात, विरेश स्वामी, सोमनाथ जाधव व इतर 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गेंट्याल टॉकीजच्या गेटसमोरील डीएस निंबाळकर कोल्ड्रींक्स हाऊस दुकानासमोर आकाश मुदगल व त्याचा मित्र सुनिल रतन चौधरी हे बोलत थांबले होते. त्यावेळी मागील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग धरून विजय जाधव व त्याच्या साथीदारांनी आकाश मुदगल व सुनिल चौधरी या दोघांना लोखंडी रॉड व लाकडी बांबूने जबर मारहाण करून जखमी केले. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक वाघमारे पुढील तपास करीत आहेत.