उजनी धरण पात्रात मंगळवार सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी कडे प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस )उलटली होती.यामध्ये एकुण 7 प्रवासी होते.
त्यापैकी 1 जण पोहत नदीच्या किनाऱ्या आला होता मात्र इतर सहा जण बेपत्ता होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबले होते. दरम्यान आज बुधवार रोजी सकाळीच एन डी आर एफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याची मोहीम हाती घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या-येण्यासाठी उजनी पात्रात लॉन्च द्वारे वाहतूक केली जाते. मंगळवार रोजी सायंकाळी कुगाव येथून गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), गौरव डोंगरे (वय 16 वर्षे) सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) कळाशीच्या दिशेने निघाला.बोट काही अंतरावर पुढे गेले असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने नदीपात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट पलटी झाली.यावेळी या बोटीत प्रवास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणीहून पोहत कळाशी (ता.इंदापूर) च्या किनाऱ्यालगत आले तर इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इंदापूर पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, घटनास्थळी दाखल झाली बोट कुठे पलटी झाली याबाबत तपास कार्य सुरू होते.
बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहत शोध कार्यास मार्गदर्शन केले. मात्र अंधार पडल्याने तपास कार्यात अडचण येत होत्या. त्यामुळे रात्री काहीच हाती लागले नाही.
त्यानंतर आज बुधवार रोजी सकाळी एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.