तभा फ्लॅश न्यूज : भ्रष्टाचाऱ्यांविरुध्द पुरावे देऊनसुध्दा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना तत्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलेत? ते कुठे आहेत? असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, धनखड यांनी राजीनामा का दिला त्याचे कारणच समोर आलेले नाही.
ते सरकारविरोधात कारस्थान करत असल्याचा संशय आल्याने त्यांना गायब केल्याचे दिल्लीत समजले. चीनमध्ये सरकारविरोधात कोणी बोलले तर तो माणूस अदृश्य होतो. राजीनामा दिला असला तरी धनखड आहेत कुठे? तब्येत बिघडली असेल तर कोणत्या रुग्णालयात आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतोय? की भाजपने थेट त्यांचे ऑपरेशन केले आहे? धनखडांचे नेमके झाले काय? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला.