सोलापूर : महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था सदाशिव पेठ पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी ऑलिंपियाड परीक्षेमध्ये उमाबाई श्राविका विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.प्रशालेतील 120 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते.
विशेष बाब म्हणजे त्यात सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सहभागासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापकांना महात्मा गांधी आदर्श प्रधानाचार्य पुरस्काराने तसेच सर्व हिंदी शिक्षकांना उत्कृष्ट सहभागासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे,वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी अभिनंदन केले.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशालेतील हिंदी विषयाचे शिक्षक माधवी खोत, अनंत बळळे, अनुप कस्तुरे वृषभ सोनटक्के यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.



















