सोलापूर – अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये शालेय विद्यार्थी यांचे शालेय साहित्य वाहून गेले होते. सदर विद्यार्थ्यांना परिपूर्ण शालेय साहित्य देवुन उमेदने केलेले सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहायता समूह मधील सदस्य, अभियानातील कर्मचारी यांनी स्वखुशीने निधी जमा करून करमाळा तालुक्यातील ७ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांना ७०० शालेय कीटचे वाटप केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, गणेश पाटील, आण्णा आवताडे, उमेश डांगे, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, दिगंबर साळुंखे, चंद्रकांत माने उपस्थित होते.
….
….
उमेद अभियानाच्या वतीने जवळपास चार लाख ५० रुपये किंमतीचे शालेय साहित्य ७०० विद्यार्थी यांना वाटप करून सामजिक कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला.



















