*एमआयडीसी परिसरात झाडांची विना परवानगी कत्तल*
वाळूज महानगर ( प्रतिनिधी): एकीकडे शासन वन महोत्सव साजरा करत आहेत व लाखो वृक्ष वृक्षांची लागवड करीत असून यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि वनप्रेमी झाडांची लागवड करून निगा राखत आहे. या सर्व प्रकाराला हरताळ फासत एमआयडीसी परिसरातील काही कारखाना चालक जागेच्या विकासाच्या नावाखाली दहा ते पंधरा वर्षे जुने असलेल्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करत आहेत. या कत्तलीमध्ये वन विभाग ही भागीदार आहे की काय असा प्रश्न वृक्ष प्रेमींनी निर्माण केला आहे.
कारखानदार वन विभागात केवळ एक अर्ज देऊन या झाडांची कत्तल करत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत हजारो झाडांची कत्तल एमआयडीसी परिसरात झाली आहे.
एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्र. 87/88 मध्ये आज सकाळी दहा ते पंधरा वर्षे जुने निलगिरीचे झाड कापून टाकण्यात आले होते
हा प्रकार कामगारांच्या लक्षात त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना फोन करून कळविला होता त्या ठिकाणी पाहणी केले असता जवळपास चार झाडे तोडून टाकण्यात आले होते तसेच उर्वरित आठ ते नऊ झाडे तोडण्याची त्यांची तयारी सुरू होती. सदर प्रकरणी ठेकेदाराकडे परवानगी विचारले असता त्यांनी पाचशे रुपयाची नोट पुढे करत ‘साहब जाने दो’ असे म्हणत मिश्किल पणे हसत सर्व मॅनेज केल्याचे त्याच्या वागण्यावरून कळत होते. वृक्ष तोडणाऱ्या ठेकेदाराला अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की मी खुलताबाद परिसरातला असून वाळूज एमआयडीसी परिसरात प्रथमच आलो आहे.एवढ्या वेळेस सोडा पुढच्या वेळेस मी सर्व परवानगी घेऊनच वृक्ष तोडेल असे सांगितले. वन विभागाला टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधला असता त्यांनी हात वर करत हा परिसर आमच्याकडे येत नाही असे सांगून फोन कट केला.
*याविषयी एमआयडीसीच्या अभियंता गणेश मुळीकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की याप्रकरणी मी संबंधित कंपनीच्या मालकाला उद्या नोटीस पाठवणार असून आज मी माझे कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून हे सर्व प्रकार थांबवला आहे तसेच कंपनी मालकाकडे कोणतीच परवानगी नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु परत त्या ठिकाणी प्रतिनिधीने पाहणी केली असता वृक्षाची तोड सुरू होती त्यामुळे मुळीकर यांनी पाठवलेले कर्मचारी मॅनेज झाले नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत होता.*
*पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षतोड करणे चांगले नाही आणि आज वातावरणामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालले आणि पर्यावरणाची चिंता देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला आहे म्हणून नागरिकांनी वाळूज एमआयडीसी परिसर असेल संभाजीनगर असेल महाराष्ट्रातील कुठेही असेल ज्या ठिकाणी झाडे असेल त्या झाडांचे संवर्धन करावे
महाराष्ट्र शासनाने पण नुकताच नवीन जीआर काढला झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपये पर्यंत दंड त्या निर्णयाचे आम्ही सगळे वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी कौतुक करतो अभिनंदन करतो . कारखाने जरूर उभे करा परंतु त्यासाठी झाडे तोडणे हा पर्याय नाही याला पर्यायी मार्ग शोधावा, झाडे रिप्लांट करण्याचे अभियान राबवावे व एमआयडिसी परिसराचे झाडे वाचवावे अशी माझी कारखानदारांना विनंती आहे.*
*पोपट रसाळ*
*वृक्षप्रेमी*