वेळापूर – पोलीस ठाण्याच्यावतीने चव्हाणवाडी बांदलवाडी येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह आणि एकत्र येण पण याच दिवाळीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलानं माणुसकीचा दीप प्रज्वलित करत समाजात एक वेगळीच दिवाळी साजरी केली.
सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ‘ऑपरेशन पहाट’ या संवेदनशील आणि समाजाभिमुख संकल्पनेअंतर्गत, वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतिने वेळापूर येथील चव्हाणवाडी बांदलवाडी येथे पारधी समाजासाठी दिवाळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० यावेळेत पार पडला. या स्नेहमेळाव्यात पारधी समाजातील २० कुटुंबांना गोड पदार्थांनी भरलेल्या शिधा-किट्सचे वाटप करण्यात आले. सुमारे २५ ते ३० पारधी समाजबांधव सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख म्हणुन पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके हे होते. यावेळी पोलिसांनी शिधा वाटप करुन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आरोग्य योजना याबद्दल उपयुक्त अशी माहिती दिली. यावेळी
पोलीस हवालदार यशवंत आनंदपुरे, हवालदार मोरे, पोलीस नाईक माळी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मुलाणी,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पांढरे यांच्यासह वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















