अक्कलकोट – श्री.स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे असंख्य स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत येणाऱ्या स्वामी भक्तांना उत्तम सोयी सुविधा देत देवस्थानची वाटचाल सुरू ठेवली होती. परंतु मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंदिर समितीचा धुरा हाती घेतल्यानंतर जास्तीत जास्त स्वामी भक्तांची निर्मिती कशी होईल याकरिता कटाक्षाने लक्ष देऊन धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची कार्यप्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून अलीकडील काळात स्वामी भक्तीचे विविध उदाहरणे देत त्यांनी भाविकांना स्वामी समर्थांची महिमा सांगितलेली आहे. या पार्श्वभूमीवर विविध समाज माध्यमांची कास धरून त्यांना संपूर्ण देशासह जगभरात स्वामी भक्तीची थोरवी निर्मिती करण्यात त्यांना मोठे यश आलेले आहे. याकरिता महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तीचा प्रसार कार्य उत्तमरीत्या सुरू असल्याचे मनोगत
ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी निलीमा सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी उपजिल्हाधिकारी निलीमा सुर्यवंशी
यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी निलीमा सुर्यवंशी बोलत होत्या. पुढे बोलताना निलीमा सुर्यवंशी यांनी मंदिर समितीच्या सेवेस नेहमीच आपला पाठींबा असल्याचे सांगून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, लखन सुरवसे, तुषार मोरे, आदित्य गवंडी
आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – उपजिल्हाधिकारी निलीमा सुर्यवंशी यांचा वटवृक्ष मंंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

















