कन्नड | संभाजीनगर – कन्नड शहरातील राजकारणात गुरुवारी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पक्षांतराने आगामी नगरपरिषद निवडणुकीचे संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक समीकरणे ढवळून काढली.
माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील यांनी दीर्घकाळाची निष्ठा सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष अहेमद अली यांनीही काँग्रेसचा झेंडा हातात घेतला.
भाजपाकडून अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष संदीप उजगारे, माजी नगरसेवक अब्दुल अजीज, सुरेश अनवडे, पिंटू शिरसे, बापू बिरारे, तसेच शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख प्रकाश काचोळे यांनीही प्रवेश करून काँग्रेसची ताकद वाढवली.
याचबरोबर ह.भ.प. साध्वी नियती गायकवाड, शाहरुख पठाण, विनोद गजलेश्वर, मीरा बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसची सदस्यता स्वीकारली.

या मोठ्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट वाढती गती मिळणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
प्रवेश सोहळ्यात नामदेवराव पवार, अहेमद अली, डॉ. सदाशिव पाटील, अब्दुल जावेद, साध्वी नियती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत काँग्रेसची भूमिका व पुढील रणनिती स्पष्ट केली.
कार्यक्रमास सचिन पवार, शहराध्यक्ष असद खान, याकुब शेख, सोमनाथ दाभाडे, वनजारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून प्रतिस्पर्ध्यांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.


















