धाराशिव – संविधानातील मूल्ये हक्क व कर्तव्य समजून घेऊन आपण वागले पाहिजे. संविधानामुळे आपण सुखी जीवन जगतो. त्यासाठी संविधान समजून घेणे ही काळाची गरज आहे असे न. प. शाळा क्र. 23 च्या मुख्याध्यापिका श्रीम. अपर्णा कुचेकर यांनी व्यक्त केले. त्या न. प. शाळा क्र. 14 येथील शाळेत संविधान दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. अपर्णा कुचेकर यांनी फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,सांगोला. जिल्हा सोलापूर येथे विभागप्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलेले आहे. त्यांनी संविधानावर अधिक विस्तारीत बोलून मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंडित कांबळे हे होते. त्यांनीही संविधान निर्मितीची प्रक्रिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यामधील कार्यभाग यावर माहिती दिली. शाळेतील युवा प्रशिक्षणार्थी शेख सदफ शारमिन मॅडम यांचा कार्यकाल संपत आल्यामुळे त्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्रीमती सुप्रिया नरवडे मॅडम व सुनीता धोत्रे यांनी सहकार्य केले. तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सुषमा वाकडे मॅडम यांनी केले तर आभार श्रीम. शेख सदफ शारमिन मॅडम यांनी व्यक्त केले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



















