सोलापूर – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांना आंबेठाण रोड, बिरवडी, चाकण, पूणे येथून ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दि. २५/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेस संशयीत आरोपी नामे सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी याने कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले असल्याचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा ०६ महिन्यापासून तत्कालीन तपासीक अंमलदार यांनी प्रयत्न करुन देखील आरोपी व पिडीत बालिका यांचा शोध घेवूनही ते मिळून न आल्याने सदरचा गुन्हा दि. ०३/०२/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर शहर येथे वर्ग करण्यात आला होता.
हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे गुन्हा वर्ग होताच अवघ्या १८ दिवसात तपासीक अधिकारी व त्याचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करुन घेवून आरोपी नामे सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी व अपह्यत मुलगी यांना दिनांक २१/०२/२०२६ रोजी आंबेठाण रोड, बिरवडी, चाकण, पूणे येथून ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता दिनांक २२/०२/२०२६ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरिक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील मपोसई/अश्विनी काळे, मसफौ. अलका शहापुरे, पोह महादेव बंडगर, पोना अ. सत्तार पटेल, चालक पोशि दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोह गायकवाड, मच्छिद्र राठोड यांनी उत्कृष्ट व शिताफिने कामगीरी करून सदरची कार्यवाही केलेली आहे.

























