मंद्रूप – येथील नरसिंह नगर (ब्राह्मण गल्ली) येथील अंतर्गत रस्त्याची दूरवस्था झालेली. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करून रस्त्याचा प्रश्नच मिटला नव्हता. खड्डे, उकीरडा, दलदल अशा घाणीतून मंदिर, मुख्य बाजारपेठेत येथील नागरिकांना येजा करावी लागत होती.
अखेर, त्या रस्त्यालगतच्या परिसरात काँक्रीट रस्त्याचे काम सुरु झाले होते. एकूण काही ठराविक अंतरापैकी काँक्रीट होणारा रस्त्याचे काम कमी होते. उर्वरीत काँक्रीट त्या खराब, दलदलयुक्त बोळामध्ये करावे, अशी मागणी येथील युवकांनी केली. पण, सहज केलेली विनंती, ऐकेल, अशी प्रशासकी यंत्रणा कसली?
तरुणांची विनंती फेटाळून लावत, काहींनी स्वत:च्या सोईनुसार उर्वरीत काम करण्याचा घाट घातला. छुप्या नकाराला, तरुणांनी उघड विरोध सुरु केला. अखेर, एकजूट झालेल्या तरुणांनी ब्राह्मणगल्लीतील श्री. वागदरीकर घर ते अभय कुलकर्णी यांचे घरापर्यंतच्या अतीयश विदारक अवस्थेतील त्या रस्त्यासाठी स्वत: पाठपुरावा सुरु केला.
सुरवातीला आव्हानात्मक वाटणारी धडपड नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांच्या सहाकार्यामुळे सुखकर झाली. या तरुणांच्या प्रयत्नांची दखल घेत, जिल्हा परिषद प्रशासनाने त्या रस्त्यासाठी स्वतंत्र पाच लाखांंचा निधी मंजूर केला. केवळ, प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तरुणांनी तो निधी मिळवलाच. निधी मंजूरीनंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे आभार व्यक्त करण्याची विनम्रता, या तरुणांनी दाखविलली.
हे विशेष… पावसामुळे रस्त्याचे मंजूर काम प्रत्यक्षाात उशीरा सुरु झाले. पण, रस्ता कसा हवा, त्या परिसरातील श्री नृसिंह मंदिर समोरील परिसराचे कॉक्रीटीकरण करणे, रस्त्याची दर्जा, गुणवत्ता नियंत्रणासाठी या तरुणांचे पथक अव्याहत प्रयत्नशील आहे.
काम कोणीही करावे, ते फक्त कागदावरील नियम, अटीची पूर्तता करुनच झाले पाहिजे… हा आग्रह सुरवतीपासून कायम ठेवला…त्यामुळे एक इंच देखील कमी जास्त झाले तरी तरुणांचे पथक, लगेच त्याबाबत विचारणा करत..
आज सोमवार (दि.३ नोव्हेंबर) रस्त्याच्या काँक्रीटीकरणास प्रत्यक्ष सुरवात झाली. या कामाचा शुभारंभ करताना, येथील तरुणांची विधायकता, कौतुकास्पद अन् खूपच प्रेरक आहे. या तरुणांनी या परिसरातील प्रत्येक घरातील माता-भगिनींना क्रॉकीट रस्तयाच्या कामाच्या शुभारंभ करण्यासाठी बोलाविले.
मााता-भगिणींच्या हस्ते रस्त्याचे काम सुरु होण्याची गावातील पहिली वेळ… आपल्याकडील पुरुषसत्ताक, पुरुषी मानसिकतेला छेद देत… येथील तरुणांनी गल्लीतील आई, मावशी, काकू, आज्जी, ताई यांना बोलाविले… संपूर्ण गल्ली हे आमचे कुटुंब आहे… वसुधैव कुटुंबकम… ही संस्कृती अन् संकल्पना… ब्राह्मण गल्लीतील तरुणांनी विधायाक कृतीद्वारे जपली आहे….
– या तरुणांच्या कार्याला, एकजुटीला, विधायाक कृतीशीलतेला सलाम..
( रानवेध फाउंडेशनने या रस्त्याला निधी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्न सार्थकी लागला…) ऐवढेच, या ठिकाणी नमूद करतो…सुरेश बलोले,
सचिन कुमठेकर विश्वनाथ कुमठेकर, अभय कुलकर्णी, शुभम गंभीरे, चंद्रकांत बलोले, अभय कुलकर्णी, सचिन कुमठेकर, आनंद देशपांडे, शुभम गंभीरे, उदय देशपांडे, सुरेश बळळोळे, विश्वनाथ कुमठेकर, महेश उमबरजे, नितीन कामतकर, आकाश बळळोळे


















