पारध / जालना – भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हदीतील आज दि. 27/11/2025 रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ वाजेच्या दरम्यान रेणुकाई पिंपळगांव ते वाकडी अन्वा रोडवर कल्याणी गावाजवळ एक फशन प्रो कंपनीची MH020B6324 या दुचाकी मोटार सायकल वर 15 किलो गोवंश जातीचे मास विनापरवाना विक्री करण्यासाठी आरोपी शे जावेद शे खाजा, शेख अल्ताफ शेख इक्राम कुरेशी दोन्ही रा. कठोराबबाजार ता भोकरदन जि.जालना यांच्याकडुन तीन हजार रुपयाचे पंधरां किलो गोवंश चें मास, साठ हजार रुपयाची मोटार सायकलं, व बाराशे रुपयाचा वजन काटा एकुण चौसष्ट हजार दोनशे रुपयाचा मुदेमाल जप्त केला व दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडुन अटक केले.
वरीलं कार्यवाही ही पोलीस निरीक्षक संतोष माने, पो कॉ संतोष जाधव सहाय्यक फौजदार जायभाये, जमादार प्रकाश शिनकर यांनी वरीलं कामगिरी केलीं. पोलिसांनी वरील दोन्ही आरोपी विरुद्ध बि. एन. एस. 2023 सहकलम5/C/9 महाराष्ट्र प्राणी संरक्षणं अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखलं केलेला आहे. यां कामगिरीचे जनतेकडुन पोलीसांचे अभिनंदन केल्यां जात आहे



























