अकलूज – सायंकाळी सहाचे सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली काही अधिक प्रमाणात गाराही पडल्या या पावसाने काढणीस आलेल्या रब्बी गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होणार असून द्राक्षे, आंबा, केळी, डाळिंब आधी फळबागांचे नुकसान होणार आहे.
आंबा पिकाचे कैऱ्या गळून पडण्याचे प्रमाण वाढेल तर द्राक्षांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मनुके तयार करण्यास अडचण येणार आहे डाळिंब पिकाचे आता उन्हाळी बहार धरले असून फुलगळ होणार असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जाते तर शेवगा पिकाचे फुलगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेंगा फळधारणा होणार नाही कलिंगड आणि खरबूज भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होईलसध्या आंबट चिंच काढण्याचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून पावसाने भिजलेले चिंच फळ खराब होते चिंचोके वेगळे करण्यास या हवामानाने मोठा त्रास होतो असे व्यापारी माने यांनी सांगितले.
मात्र जनावरांच्या चाऱ्याची पिकेकडवळ उन्हाळी भुईमूग ऊस या पिकांची अंघोळ झाल्याने पिकांना तेजगी येईल असे शेतकरी वर्गातून बोलले जाते हा पाऊस माळीनगर,यशवंत नगर अकलूज, आनंदनगर, बागेची वाडी आधी परिसरात झाला आहे दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर तापमान वाढले होते या पावसाने
थोडासा दिलासा मिळाला आहे वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या कैऱ्या पडलेल्या असल्याने बाजारात विक्रीला आल्या आहेत
























