बार्शी – सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस किशोरी हितगुज मेळावा म्हणून साजरा केला जातो. पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शीच्यावतीने तालुक्याचा किशोरी मेळावा राज लॉन्स बार्शी येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठों) शाळेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बक्षिसाची हँट्रिक साधली.
या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका दिपाली गोरे यांनी पोष्टर स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर त्यांचीच विध्यार्थीनी कु.सानिका बालाजी ठोगे हिने चित्रकला स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.अमृता आण्णासाहेब भोसले या विध्यार्थीनीने रांगोळी स्पर्धेत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. याचबरोबर इयत्ता ७ वीच्या विध्यार्थीनिनी अप्रतिम असे कृतीयुक्त स्वागतगीत व लेझीम नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
शाळेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सविता भोंग, उपाध्यक्ष श्रीमती योगिता सदावर्ते, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख शिवाजी कांदे, विस्तार अधिकारी भारत बावकर, गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी नाटके यांनी अभिनंदन केले आहे.
















