सोलापूर – मजरेवाडी येथील शमा उर्दू शाळेत तमसीली मुशायरे द्वारा जुन्या कवींची आठवण करत त्यांचे विविध रचना विद्यार्थ्यांनी सादर करून वाह वाह मिळविली.
तमसिली मुशायरेत [ प्रतिकात्मक काव्य संमेलनात ] कवींचे कपडे वेशभूषा . धारण करणे हे फॅशन शो नसून ह्याच्या माध्यमातून ऊर्दू साहित्यिक वारसा जपण्याची एक संधी असते आणि विशेष म्हणजे स्थानिक कवींना या माध्यमातून आपण त्याची आठवण व त्याच्या साहित्य चालू पिढी पर्यंत पोहचवीत असतो म्हणून असे कार्यक्रम वेळोवेळी होणे गरजेचे वाटते . असे मत शमा उर्दू शाळेत उर्दू दिवसा निमित आयोजित “तमसीली मुशायरेत” उर्दू चे ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ रशीद शेख यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शमा संस्थेचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू होते तर प्रा बी एच करजगीकर , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्व प्रमुख पाहुण्याचे हस्ते दीप प्रज्वलित करून काव्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी अबरार अहमद यांनी प्रस्ताविक करत उर्दू दिवसाचे महत्व विषद केले
प्र .मुख्यध्यापिका यास्मीन बिजापूरे यांच्या देखरेखेखाली झालेल्या या प्रतिकात्मक काव्य संमेलन साठी कवियत्रि शाहीन शकील “सदफ ” यानी विशेष परिश्रम घेत सुरेख सुत्रसंचलन करून मुशायरेत रंगत आणली , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले
यानी घेतला सहभाग
या तमसीली मुशायरेत स्थानिक कवी स्व. कदीर सोलापूरी व स्व नसीम मन्नान यांचे कविता शेख शरजील शेख रेहान यांनी सादर केले तर कवियत्रि सबा बलामपूरी पटेल ज़ारा , शबीना अदीब शेख आसीया , हिमांशी बाबरा – शेख रुखसार , परवीन शाकीर – शेख जैनाब, शायस्ता सना – साबूनगर उज़मा , लता हया – शिबा पटेल , कवी इम्रान प्रतापगडी – कासीम पटेल , बशीर बद्र नदाफ फैज़ान , राहत इंदोरी – शेख अखलाक , इकबाल अशअर – शेख ज़िया , सय्यद खन्सा यांनी सहभागी होऊन दिवंगत कवीच्या विविध रचना सादर केले व त्यांच्या आठवणीना उजाळा दिला .























