अक्कलकोट – विद्यार्थ्यांनी समाज माध्यम पासून दूर राहून निमितपणे अभ्यास केला पाहिजे. समाज माध्यमावर नुसते रील बघून आपला वेळ वाया जातो. त्यापेक्षा आपण मोबाईलचा आणि समाज माध्यमाचा वापर आपल्या अभ्यासासाठी केल्यास आपले भविष्य उज्वल होऊ शकते ‘
असे प्रतिपादन येथील उत्तर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक भिताडे यांनी केले.
येथील मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथे बुधवारी भारतीय संविधान दीन व २६/११ शहीद दीन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर .एस. पडवळकर हे होते. यावेळी व्यासपीठावर, पोलिस निरीक्षक दीपक भिताडे, एन. सी सी चे हवालदार विक्रमजितसिंग, हवालदार अजित जाधव, जेष्ठ शिक्षक वाय.पी.कबाडे, एन. सी सी प्रमुख एस.एस. जवळकोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व शहीद दिनानिमित २६/११ तील शहिदांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संविधान प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
पुढे बोलताना पोलिस निरीक्षक दिपक भिताडे यांनी समाज माध्यम व सायबर गुन्हे याबाबत उदाहरण सांगुन विद्यार्थांनी समाजमाध्यमावर व मोबाईल मध्ये वेळ वाया न घालवता नियमित अभ्यास करून यश मिळवा असे आवाहन केले. तसेच वाहन चालवू नका, शिक्षकांना व आई वडिलांना दररोज वंदन करा व नियमांचे पालन करा असे सांगितले.
एन. सी सी प्रमुख एस.एस. जवळकोटे यांनी भारतीय संविधान दिन बाबत अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. संविधान दिनाचे औचित साधून प्रशालेत रांगोळी स्पर्धा, सेल्फी पॉईंट, भाषण, प्रश्नोउत्तरे आदी विविध कार्यक्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख जे. एस.बगले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन एम एम साळुंखे यांनी केले तर आभार एन.एम.तांबोळी यांनी मानले.

















