उत्तराखंडची ओळख ब्रह्मकमळाशी जोडलेली आहे. ही भूमी ब्रह्मकमळाची भूमी असून यावेळीही येथे पंचकमळ पूर्ण अभिमानाने बहरणार आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडमध्ये पंचकमळ उमलण्याची गरज आहे, कारण विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंड हे भाजपा सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ऋषिकेश, उत्तराखंड येथे आज, गुरुवारी आयोजित केलेल्या एका विशाल जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, जनतेने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने बनवण्याचे मनात आधीच ठरवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री पुष्कर धामी, माजी मुख्यमंत्री श्री रमेश पोखरियाल निशंक, माजी मुख्यमंत्री श्री विजय बहुगुणा, गढवालचे भाजपा उमेदवार श्री अनिल बलूनी, हरिद्वारचे भाजपा उमेदवार श्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि टिहरी गढवाल येथील श्रीमती माला राज्य लक्ष्मी शाह यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. आदरणीय पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या जनतेला श्री अनिल बलुनी, श्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि श्रीमती माला राज्य लक्ष्मी शाह या तीन उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देवभूमी उत्तराखंडमध्ये देवतांचे आवाहन करण्याची परंपरा आहे आणि आज मलाही हुडका वाजवून हा बहुमान मिळाला आहे. देशाच्या दक्षिण टोकापासून ते हिमालयाच्या कुशीतल्या उत्तराखंडपर्यंत पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा ऐकू येत आहे. हा नारा देशात दुमदुमत आहे कारण जनतेने 10 वर्षांच्या पूर्ण बहुमताच्या स्थिर सरकारने केलेले काम पाहिले आहे. आज केंद्रात असे सरकार आहे, ज्याने भारताला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत केले आहे. जेव्हा-जेव्हा भारतात कमकुवत आणि अस्थिर सरकार होते, तेव्हा त्याचा फायदा शत्रूंनी घेतला आणि दहशतवादाने देशात पाय पसरवले. पण आज देशात मोदी सरकार आहे, जे दहशतवाद्यांना घरात घुसून मारते. भारताच्या स्थिर आणि मजबूत सरकारमुळे देशाचा तिरंगा युद्धक्षेत्रातही सुरक्षेची हमी बनतो. केंद्रातील भाजपा सरकारने 7 दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचे, तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्याचे धाडस केले. भाजपा सरकारने देशातील महिला शक्तीला लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचे काम केले, तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचे काम केले.
हे दशक उत्तराखंडचे दशक असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. अनेक दिवसांपासून ऋषिकेशमध्ये इतर राज्यांतून आणि देशातून लोक योगा करण्यासाठी येत आहेत. पर्यटनाच्या क्षेत्रात मग ते राफ्टिंग असो, कॅम्पिंग असो किंवा अध्यात्मविषयक असो ऋषिकेश सर्वांत आघाडीवर राहिला आहे. भाजपा सरकार उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना देऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहे. पर्यटकांचा प्रवास सुरळीत व सुलभ व्हावा, यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे देवभूमीतील रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचे श्री मोदी म्हणाले. दिल्ली ते डेहराडूनचे अंतरही कमी होत आहे. काँग्रेस उत्तराखंडमधील सीमावर्ती गावांना शेवटची गावे म्हणत असे, परंतु भाजपा त्यांना देशातील पहिले गाव मानून परिसराचा विकास करत आहे. आदि कैलास, ओम पर्वत यांसारख्या मानसखंडातील तीर्थक्षेत्रांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. यमुनोत्री, केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये रोपवे बांधण्यात आल्याने यात्रेकरूंना आता सोयीस्करपणे दर्शन घेता येणार आहे. चारधाम प्रकल्पांतर्गत केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री हे सुमारे 900 किमी लांबीच्या महामार्गाने जोडले जात आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे भाविकांना उत्तराखंडमध्ये पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. आज हे शक्य झाले कारण भाजपाचे हेतू बरोबर असतात आणि जेव्हा हेतू बरोबर असतात तेव्हा त्याचे परिणामही बरोबर असतात.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी सुमारे 20 लाख भाविक केदारनाथच्या दर्शनासाठी आले होते आणि जर आपण चारधाम यात्रेबद्दल बोललो, तर गेल्या वर्षी 55 लाखांहून अधिक भाविकांनी उत्तराखंडला भेट दिली होती. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांनी मानसखंड येथील आदि कैलाश आणि ओम पर्वताला भेट दिली होती, ज्याद्वारे लोकांना हिमालयातील अलौकिक ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. पर्यटनाचा हा विस्तार म्हणजे केवळ एका क्षेत्राचा विकासच होत नाही, तर त्यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधींही वाढत आहेत. उत्तराखंडमध्ये होत असलेल्या या विकासामुळे स्थलांतराच्या बातम्या आता भूतकाळातील झाल्या आहेत. आता उत्तराखंडमधून स्टार्टअपच्या बातम्या ऐकायला मिळतात. उत्तराखंडमधील तरुणांनी 1000 हून अधिक स्टार्टअप्सची नोंदणी केली आहे आणि त्यातही सुमारे 500 स्टार्टअप्सचे नेतृत्व देशातील मुली करत आहेत.