सोलापूर – दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा होतो.
संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
इयत्ता 10. वी तील राजलक्ष्मी येलदी हिने दिनविशेष आपल्या मनोगतातून व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त सौ रेखा बाबानगरे संविधानाची प्रास्तावना व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. सौ सुनिता मंद्रुपकर यांनी संविधानातील नागरिकांचे मुलभूत कर्तव्य याविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच यांनी प्रत्येक नागरिकांने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्श, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा असे आव्हान केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील व शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.



















