नांदेड / माहूर – येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. ०७ नोव्हेंबर रोजी तहसीलदार अभिजित जगताप यांचे अध्यक्षतेत तथा
प्रमुख वक्ते जगदीश तावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे,योगी शामजी भारती महाराज, महाराष्ट्र शासनाचे स्वच्छतादूत प.पु. साईनाथ महाराज, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,
गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, आयएमसी सदस्य संजय सुरोशे, सतीश कान्नव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ या भारत मातेच्या स्तुती गीताचा सोहळा संपन्न झाला.
कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात बकीमचंद चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रीय चेतना गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्थानिक हिरकणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रा. प्रतिभा पाटील यांचेसह उपस्थितांनी वंदे मातरम् हे गौरव गीत गायिले.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून जगदीश तावडे यांनी वंदे मातरम् शतकोत्तर सुवर्णं महोत्सवाची महत्ती विशद करतांना सांगितले कि, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांमध्ये चेतना निर्माण करून वंदे मातरम् या गीताने स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे वास्तव कथन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना तहसीलदार अभिजित जगताप यांनी वंदे मातरम् हे गीत प्रेरणा स्रोत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.प्रास्ताविक अश्विनी पोतदार यांनी केले. सूत्रसंचलन एस.एस.पाटील यांनी केले, तर के.पी. वाकोडे यांनी आभार मानले.




















