सोलापूर – महापालिकेचे ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, यामध्ये शिवसेना पक्षातील ज्येष्ठ, प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता अजय दासरी यांनी एकला चलोरे ची भूमिका बजावत पक्षाचं कामकाज सुरू ठेवल. त्याला आम्ही सहमत नव्हतो. निवडणूका शिवसेना पक्षाला ताकतीने लढवायची असेल तर ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन लढवली पाहिजे अशी भूमिका वरिष्ठांकडे कळवली होती, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पदाचा राजीनामा दिला. आमची जी खदखद होती त्याची दखल घेत वरिष्ठांनी निवडणुक समन्वयक समिती स्थापन केली आहे. आम्ही पक्षाचा न्हवे तर पदाचा राजीनामा दिला होता. आमच्या मागण्या मान्य झाल्याने आम्ही पदावर कार्यरत राहणार असून येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष महापालिका निवडणूक मोठ्या ताकतीने लढवू अशी माहिती दत्तात्रय पंत वानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमच्या पदाचा राजीनामा आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्याकडे दिला होता परंतु तो त्यांनी नामंजूर केला. आमचे म्हणणे पक्षाने ऐकले त्यामुळे आमचे मतभेद संपलेले आहेत. महापालिका निवडणूक समितीमध्ये पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संतोष पाटील, अस्मिता गायकवाड, प्रिया बसवंती या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात एकदिलाने, एकमतानं, एका ताकतीने महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ असेही पंत म्हणाले.
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, पुरुषोत्तम बरडे, अस्मिता गायकवाड, संतोष पाटील, प्रताप चव्हाण, लक्ष्मण जाधव, विठ्ठल वानकर, महेश धाराशिवकर, प्रिया बसवंती, बालाजी चौगुले, म्हेत्रे, बाळासाहेब गायकवाड आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा प्रवेशाबाबत गणेश वानकर आणि बरडे यांनी केला खुलासा –
आम्हाला कोणत्याही पक्षाकडून विचारणा झालेली नाही,आम्ही कुणाला संपर्क केला नाही. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. यापूर्वी देखील शिवसेनेत आम्ही होतो, आता देखील आहोत आणि भविष्यात देखील शिवसेने सोबत राहणार आहे.
21 नगरसेवकांची संख्या यावेळेस वाढलेली दिसेल –
महाविकास आघाडीची बैठकीत जागावाटप होणार असून आम्ही एका ताकतीने सोलापूर महापालिका निवडणूक लढवू. 2017 मध्ये शिवसेनेचे 21 नगरसेवक होते, यावेळी ही संख्या वाढलेली दिसेल व महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल.
– गणेश वानकर

















