सोलापूर – श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात व श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी शिक्षण संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . शुक्रवार ३० जानेवारी रोजी अक्कलकोट रोड येथील एस. व्ही. सी. एस. डी. एड. कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा, शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व शनिवार ३१ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा व १ फेब्रुवारी रोजी श्री भगवती गौरीमाता प्रशाला धोत्री येथे चतुर्थी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने सकाळी ९.०० वा. सर्व रोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटे२.१० वा. उत्तर कसव्यातील होटगी मठात व मौजे होटगी ता.द.येथील मठात शिवाचार्यांच्या हस्ते आत्मज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रद्धांजली समर्पण सभा होणार आहे. पहाटे ५.०० वा. काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे आत्मज्योत शिरावर घेऊन हजारो भक्तगणांच्या समवेत भक्तीमय वातावरणात उत्तर कसव्यातील होटगी मठातून मौजे होटगी ता.द.सोलापूर कडे सवाद्य मिरवणुकीने मार्गस्थ होणार आहेत.
श्री वीरतपस्वी पुण्यतिथीनिमित्त बाळीवेस येथील मठात गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० वा. श्री गुरु गादीस संगीत महारुद्र पूजा, सहस्त्रबिलवारचन, सायंकाळी ६.०० काशी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात व शिवाचार्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास आरोग्य दूत तथा वैद्यकीय सहायता कक्ष चे प्रमुख मंगेशजी चिवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रात्री ८.०० वा.गीतसंध्या व १०.०० वा. भजन व किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. सोमवार २६ जानेवारी ते गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत बाळीवेस व मौजे होटगी ता.द. सोलापूर येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री सिद्धांत शिखामणी पारायण, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बाळीवेस मठात भजन, भारुड व किर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील बृहन्मठात बुधवार ४ फेब्रुवारी रोजी प्राईम केअर हॉस्पिटल व रेणुकाचार्य क्लिनिक यांच्या सौजन्याने डॉ आप्पासाहेब उमदी यांच्या दवाखान्यात आरोग्य तपासणी शिबिर होणार असून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुल कारीमुंगी यांची उपस्थिती असणार आहे. त्याच दिवशी होटगी भक्तगणांच्या वतीने सकाळी ९.००वा. रक्तदान शिबिर व सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी ते गुरुवार ५ फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी ७.०० वा. पडदहळी( कर्नाटक) येथील प्रसिद्ध प्रवचनकार महालिंगया शास्त्री- हिरेमठ यांचे प्रवचन आयोजित केलेला आहे.
शुक्रवार ६ फेब्रुवारी सकाळी ११.०० वा. आत्मज्योतीचे होटगी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दु. ४.०० वा. नंदीध्वज व पालखी उत्सव, सायं. ७.०० वा. पाळणा, रात्री ८.००वा.शोभेचे दारूकाम होणार आहे. संस्थेने आयोजित केलेल्या या सर्व कार्यक्रमात भक्तगणानी तन, मन,धनाने सहभागी व्हावे असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
चौकट- वीरतपस्वी व्याख्यानमाला व आनंदमेळाचे आयोजन – बुधवार दि ४ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा.
श्री चक्रवर्ती सुलेबली यांचे ‘स्वामी विवेकानंद एक विचार प्रवाह’ या विषयावर व्याख्यान होणार असून शनिवार ३१ जानेवारी ते सोमवार २ फेब्रुवारी असे ३ दिवस सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० पर्यंत अक्कलकोट रोडवरील वीरतपस्वी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम, ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत भव्य आनंदमेळाचे आयोजन करण्यात आलेले असून या आनंदमेळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

























