अक्कलकोट – प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी रामन परिणाम हा महत्त्वपूर्ण शोध लावला त्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विज्ञान विद्या शाखेच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त थोर वैज्ञानिकांची यशोगाथा, प्रश्न उत्तरे, कॉम्पिटिशन सिरॅमिक रांगोळी आदी उपक्रम येऊन साजरा करण्यात आला.
डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा विज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संशोधकांनी लावलेल्या विविध शोधांची माहिती सांगितली, त्यानंतर प्राध्यापिका मनीषा शिंदे म्हणाल्या की,विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश अंधश्रद्धा आणि अपप्रचार दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागावी, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, मोबाईल,संगणक, इंटरनेट, वैद्यकीय साधने, शेतीची उपकरणे या सर्व गोष्टी विज्ञानाची देणगी आहे. विज्ञानामुळे आरोग्य, शिक्षण व उद्योग या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे विज्ञान दिन हा केवळ स्मरण दिन नसून विज्ञानाच्या उपयुक्ततेची जाणीव करून देणारा दिवस आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका विद्याश्री वाले यांनी केले, आभार प्राची गणेचारी यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ बाळासाहेब पाटील, प्रा सौरभ भस्मे, ओंकार घिवारे, विद्या बिराजदार, मधुबाला लोणारी उपस्थित होते

























