अक्कलकोट – महाराष्ट कर्नाटक सीमेवरील आळंद तालुक्यातील निरगुडी येथे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान जागृत श्री रेवणसिद्धेश्वर मल्लिनाथ देवस्थान महाशिवरात्र यात्रा महोत्सव निमित्य रविवार दि. १५ पासून देशभरातील लाखो भाविकांच्या उपस्थित विविध धार्मिक सामाजिक व देशभक्ती कार्यक्रम आयोजित केली आहे.
जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात प्रत्येक महाशिवरात्र यात्रेस निरगुडी येथे महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा,गुजरात राजस्थान अशा विविध राज्यातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी मोठी गर्दी करतात. यंदा यात्रा कमिटीचे वतीने यात्रेची जयत्त तयारी करण्यात आले असून बैल, खोंड, गाई सह अनेक जनावराचे गड्डा यात्रा भरविण्यात आला आहे. रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी देशभक्तीसह भजन भारूड कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री ८ वाजता निरगुडी येथील वें.कै.शंकरय्या स्वामी यांच्या घरातून श्री रेवणसिदेश्वर मल्लिनाथ देवस्थान पर्यंत श्री चे पालखी,नंदिध्वजचे पुरवंतसह विविध वाद्यसमवेत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता श्री चे रुद्राभिषेक पूजा, अग्नी पूजा, या नंतर दिवसभर सर्व धर्माचा आणि सर्व पक्षाचा प्रमुख उपस्थिती धर्मसभा कार्यक्रम होणार आहे . दुपारी ४ वाजता श्रीचे रथोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि.१५, १६ व १७ फेब्रुवारी रोजी देशभक्ती गीत गायन भजन सह श्रीचे दर्शन सोहळा कार्यक्रम होणार असून या काळात दिवस रात्र महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आला आहे.
शिवभक्तांनी आपले जिवन सार्थक करून शिवभक्तीतुन देशभक्ती मार्गाकडे वळावे, म्हणून श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजानी कर्नाटका, गुजरात,आंध्रा आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात जय भारतमाता सेवा समितीची शाखा स्थापना केली असून सुमारे साडेसहा हजारोहून अधिक शिवलिंग देवस्थानाची उभारणी केली आहेत.देशभरातील लाखो भाविक भक्त निरगुडी येथील शिवरात्री यात्रा महोत्सव साठी मोठया संख्याने आवर्जून उपस्थित राहतात.






















