अक्कलकोट – नगरपालिकेने लाखो रुपए खर्च करून कांदा बाजार येथे भाजी विक्रेतेसाठी उन पावसा पासुन संरक्षणा साठी शेड व्यापारीकट्टे बांधली . पण ह्याचा वापरच होत नाही . सोमवारी आठवडा बाजारात भाजी विक्रेते उघड्यावर चिखल पाणी रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसत आहेत यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते .
अक्कलकोट नगर पालिकेने लाखो रुपए खर्च करून कांदा बाजार येथे भाजी मंडई बांधली भाजी विक्रीसाठी ऊन पावसा पासुन संरक्षणासाठी व्यापारी कट्टे बांधली मात्र सोमवारी आठवडा बाजारहा रस्त्यावरच भरला जात आहे . पत्राशेड मधील भाजी विक्रेते कट्टे ओसाड पडली आहेत . रस्त्यावर चिखलात पाऊसात भाजी विक्री होत आहे.
यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा येऊ शकते . नगरपालिकेने लाखो रुपए खर्च करून भाजी मंडई शेड व्यापारी कट्टे बांधली मात्र आठवडा बाजार रस्त्यावरच भरला जात आहे आठवडा बाजार हा भाजी मंडईतील व्यापारी कट्टयावर भरल्यास भाजी उन पाऊस चिखल यापासुन सुरक्षित राहिल . यामुळे भाजी दुषित होणार नाही ग्राहकाना स्वच्छ भाजीही मिळू शकेल असे नागरीकातुन बोलले जात आहे
१ )कांदा बाजार भाजी मंडई मधील भाजी विक्रीसाठी बांधलेले कठडे ओसाड असल्याचे छायाचित्र
२) उन्ह पाऊस चिखल साचलेल्या पाण्या जवळ रस्त्यावर आठवडा सोमवार बाजार भरल्याचे छायाचित्र

























