अक्कलकोट – तीर्थक्षेत्री दिवसोदिवस येणाऱ्या भाविकांची वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे . रहदारी मोठया प्रमाणात वाढून देखील अदयापही तीर्थक्षेत्र अक्कलकोट मधील रस्त्याचे अद्यापही एकदाही रस्ते रुंदीकरण झाले नाही . यामुळे बसस्थानक परिसर मेन रोड बाजार पेठ सावरकर चौक आदि भागात वाहतुकीची कोंडी होत आहे . अनेक चौकात एसटी बस ला वळण घेणेसाठी अंत्यत धोकादायक जोखमीचे बनत चालले आहे यामुळे तातडीने तीर्थक्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी जोर धरत आहे .
सध्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांची संख्या वाहनांची संख्या वर्षभरात साजरा होणारे उत्सव यानिमित्याने शहरातुन निघणारे पालखी उत्सव मिरवणुक येणाऱ्या पायी येणारे दिंडी पालखी सोहळे हे पाहता यापुर्वी रस्ते रुदीकरणाचे ठरलेले नियोजन यामध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत पुढील २० वर्षात वाढणरी भाविकांची संख्या नजरे समोर ठेऊन रस्ते रुंदीकरण करणे भुसंपादन करणे गरजेचे आहे भुसंपादन ही वारंवार होणारी बाब नाही यामुळे पंढरपुर शिर्डी तुळजापुर या धर्तीवर अक्कलकोट तीर्थक्षेत्री रस्त्याचे रुंदीकरण कामे हाती घेणे गरजेचे बनले आहे .
मास्टर प्लॅन)-
सन १९७२ मध्ये मास्टर प्लॅन नगरपालिकेने तयार केला असला तरी शासनाने सुचविलेल्या सूचनेवरून वेळोवेळी त्यात दुरुस्ती करणेत आले आहे. सुधारित प्लॅन २०१२ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिण महाद्वार ते मुरलीधर मंदिर, फत्तेसिह चौक, तूप चौक ,कापड बाजार मेन रोड, कारंजा चौक, मार्गे समाधी मठ ते ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर पर्यंत असे आहे. हा मार्ग १२ मीटर रुंदीचे, ८५० मीटर लांबीचे असणार आहे. सध्या २५ ते २८ फुटाचे रस्ता अस्तित्वात असून आणखीन दोन्ही बाजूने मिळून १० फुटाचा भूसंपादन कराव लागणार आहे. यासाठी किमान २०० प्रॉपटी बाधित होणार आहेत.
दुसरा मार्ग:- मंदिराच्या उत्तर महाद्वार ते गुरू मंदिर, राम गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, दावल बँड ते कारंजा चौक मार्गे समाधी मठ असा दुसरा पालखी मार्ग असणार आहे. ९ मीटर रुंदीचा, ६०० मीटर लांबीचा असून सध्या २२ फुटाचा रस्ता अस्तित्वात आहे. दोन्ही बाजूने मिळून ८ फुटाचा भूसंपादन करावा लागणार आहे. १२५ ते १५० प्रॉपर्टी बाधित होणार आहे.
फोटो १) विजय कामगार चौक येथे तुळजापुर कडून येणारी वाहने अरुंद रस्ते वाढते अतिक्रमण रस्त्यावर थांबणारी ॲटो रिक्षा वाहने यामुळे वादनाना भर चौकात वळण घेणे धोकादायक जोखमीचे होत असल्याचे बोलके छाया चित्र
२) बसस्थानक बाहेर ॲटो रिक्षा अवैध प्रवासी वाहने यामुळे एसटी बसला रस्त्यावरून जाणेही कठिण असल्याचे छायाचित्र
























