मोडनिंब – घरकुलासाठी श्री वेताळ परिवाराच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. दोन दिवसांनंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना न्याय मिळावा, थांबवलेले हप्ते तत्काळ सोडावेत आणि पात्र नागरिकांना घरकुलाचा हक्क मिळावा या मागण्यांसाठी ‘ग्रामदैवत श्री वेताळ परिवार, मोडनिंब यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
प्रकाश गिड्डे, ऋषिकेश कोठावळे आणि समस्त वेताळ परिवार यांनी केले. २३३ लाभार्थ्यांचे हप्ते थांबवणे आणि १०९ घरकूल नाकारणे या अन्यायकारक निर्णयाविरोधात गावात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीकडे आणि प्रशासनाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही तोडगा न निघाल्याने अखेर वेताळ परिवाराने उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
या पत्रात पंचायत प्रशासनाने मागण्या मान्य करत काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार, ४९१ लाभार्थ्यांपैकी २३३ जणांना पहिला हप्ता आधीच देण्यात आला असून, उर्वरित १८२ लाभार्थ्यांना लवकरच हप्ता मंजूर करण्यात येईल. तसेच १०९ लाभार्थ्यांच्या पात्रतेची फेर तपासणी करून १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, पूर्वीच्या कामांमध्ये झालेल्या संभाव्य अनियमिततेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे आणि पारदर्शकतेने योजना राबविण्याचेही ग्रामपंचायतीने लेखी दिले आहे.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे, हनुमंत कुंभार, धनाजी लादे, सुरेश जाडकर, किरण तोडकरी, दीपक सुर्वे, राजकुमार खडके, शंकर कोठावळे, दत्ता जाडकर, संजीव शिंदे, चंद्रकांत ओहोळ आदी उपस्थित होते
प्रशासनाच्या वतीने विस्तार अधिकारी महेश पाटील यांच्या शिष्टाईला यश येत देण्यात आलेल्या फेर सर्वेक्षणाच्या लेखी हमी नंतर मंगळवारी उपोषण मागे घेण्यात आले. २३३ लाभार्थ्यांनी वारंवार सर्व कागदपत्रे जमा करून देखील अद्याप हप्ते देण्यात आलेले नाहीत. याबाबत ग्रामपंचायतकडे विचारणा करण्यात आली होती. नामंजूर घरकुले तसेच मंजूर लाभार्थ्यांना हप्ते देण्यात आले नाहीत.
यासाठी आम्ही गटविकास अधिकारी कार्यालयासमोर देखील उपोषण केले होते. मार्च २०२६ पर्यंत नामंजूर घरकुल मंजूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विस्तार अधिकारी महेश पाटील यांनी दिले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला.
 
	    	 
                                


















 
                