उदगीर / लातूर – बिहारसह संपूर्ण देशाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होत असलेला देशाचा विकास आणि दूरदर्शी नेतृत्व निवडले आहे, हेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या निवडणुकीतील भाजपा-प्रणित एनडीएच्या भव्य विजयाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी उदगीर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य ‘विजयोत्सव’ साजरा करण्यात आला. या विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

















