देगलूर / नांदेड : देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांनी काँग्रेसच्या श्रीमती मनोरमा मष्णाजीराव निलमवार यांना अटीतटीच्या लढाईत अवघ्या 244 मतांनी पराभव करत विजयावरती शिक्कामोर्तब केले. नगराध्यक्षा पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी आपले नशीब आजमावले, पण खरी लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातच झाली. तब्बल सत्तावीस नगरसेवक पदापैकी पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने तब्बल पंधरा उमेदवार विजय मिळवत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले तर काँग्रेस पक्षाच्या बारा उमेदवारांना विजयाचा गुलाल लागला. लक्ष्मीकांत पदमवार यांनी आपल्या निष्ठावंत शिलेदारासह राष्ट्रवादीची एकहाती खिंड लढवत नगरपरिषदेवर झेंडा फडकवला. पदमवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देगलूरकरांनी राष्ट्रवादीच्या हाती सत्ता दिली.
देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल आज दि. 21 डिसेंबर (वार रविवार) रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने बाजी मारत 15 नगरसेवकांसह नगराध्यक्षाचे पदही स्वतःच्या ताब्यात घेत नगरपरिषदेवर झेंडा लावला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे टाकले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सौ विजयमाला बालाजी टेकाळे यांनी 14965 मते मिळवली तर काँग्रेस पक्षाच्या श्रीमती मनोरमा मष्णाजीराव निलमवार यांनी 14721 मते घेत अटीतटीच्या लढाईत अवघ्या 244 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे सौ. नीलाबाई गंगाधर भांगे यांना 1409 मते, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे सौ. जयश्री बाळू काब्दे यांना 857, अपक्ष उमेदवार मुस्कान मोहोमद इलियास कुरेशी यांना 212 मते आणि नोटा’ला 143 मिळाली आहेत. नगराध्यक्षा पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची लढत ठरली, शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची वाट पाहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या या विजयाबद्दल लक्ष्मीकांत पदमवार आणि बालाजी टेकाळे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.
सत्तावीस नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने वर्चस्व राखत तब्बल पंधरा नगरसेवक विजयी झाले तर काँग्रेस पक्षाचे एकूण बारा नगरसेवक विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजपा यांनी सत्तावीस जागावरील सर्व उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरविले होते. तर शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) पक्षाचे अकरा उमेदवार, ए.आय.एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रत्येकी तीन तीन उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि ए.आय.एम.आय.एम. यांना विजयाचे खातेही उघडता आले नाही. पण भाजपाच्या काही उमेदवारांनी चांगलेच मताधिक्य घेत निवडणुकीच्या शर्यतीत झुंज दिली. या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांही पराभवाला सामोरे जावे लागले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने जनतेतही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आज दि. 21 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांचे भविष्य स्पष्ट झाले. ‘कहीं खुशी तो कांहीं गम’ अशा अवस्थेत ही निवडणूक संपन्न झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विजयी नगराध्यक्षा आणि नगरसेवक
*सौ. विजयमाला बालाजी टेकाळे (नगराध्यक्षा)
1) कडलवार शोभा दिगंबरराव (प्रभाग क्रमांक 01 अ)
2) मैलागिरे रोहिणी बालाजी (प्रभाग क्रमांक 01 ब)
3) तोटावर योगेश्वरी लक्ष्मण (प्रभाग क्रमांक 05 अ)
4) बोन्लावार अनिल गंगाराम (प्रभाग क्रमांक 06 अ)
5) कौरवार रत्नमाला रमेशराव (प्रभाग क्रमांक 06 ब)
6) कांबळे मीनाक्षी व्यंकट (प्रभाग क्रमांक 07 अ)
7) देशाई अंकुश सुरेशराव (प्रभाग क्रमांक 07 ब)
8) शाखावार नंदकिशोर लक्ष्मण (प्रभाग क्रमांक 08 अ)
9) शेख आर्शियाफातिमा पाशामियाॅं (प्रभाग क्रमांक 08 ब)
10) टेकाळे (बबलू) एकनाथ शेषराव (प्रभाग क्रमांक 09 ब)
11) जमीन बेगम सय्यद निसार (प्रभाग क्रमांक 11 अ)
12) पदमवार उज्वला लक्ष्मीकांत (प्रभाग क्रमांक 11 ब)
13) कांबळे सुमंत रामचंद्रराव (प्रभाग क्रमांक 12 अ)
14) दयाडे पल्लवी रुपेश (प्रभाग क्रमांक 12 ब)
15) मोरे कलावती माधवराव (प्रभाग क्रमांक 12 क)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजयी नगरसेवक
- अमरीननुरी अब्दुल आहद (प्रभाग क्र. 02 अ)
- शेख मीरामोहीयोद्दीन शेख सातार (प्रभाग क्र. 02 ब)
- कांबळे स्नेहा राजाराम (प्रभाग क्र. 03 अ)
- सय्यद मुहितओद्दिन मुजीबोद्दीन (प्रभाग क्र. 03 ब)
- शत्रुघ्न जळबा वाघमारे (प्रभाग क्र. 04 अ)
- महबूब बी शेख अब्दुल रशिद (प्रभाग क्र. 04 ब)
- कंधारकर लक्ष्मण लच्छमन्ना (प्रभाग क्र. 05 ब)
- इतापे प्रेमला दत्तात्रेय (प्रभाग क्र. 09 अ)
- दौलताबादी कुलसुम बी म. आयुब (प्रभाग क्र. 10 अ)
- रोहिलावार बालाजी गंगाराम (प्रभाग क्र. 10 ब)
- येशमवार रत्नमाला सुनिल (प्रभाग क्र. 13 अ)
- सुनिल हुल्लाजी कोयलावार (प्रभाग क्र. 13 ब)
परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रमाचे बॅनर झळकले
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या या विजयाचे ‘परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रमा’चे देगलूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात झळकले आहे. या निवडणुकीचे उत्तम नियोजन करुन हा विजय खेचून आणल्याचा अर्थ बॅनरमधून निघतो. लक्ष्मीकांत पदमवार यांनी म्हणाले की, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला मी पात्र ठरलो असे ते म्हणाले. एकूणच पदमवार आणि त्यांच्या शिलेदाराचे परफेक्ट नियोजन यशोशिखराला गवसणी घालणारी ठरली.

















