सोलापूर : सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या के. के. एएक्सप्रेसच्या रेल्वे इंजिनने पेट घेतला होता. रेल्वे ड्रायव्हर होरपळुन झाला. जखमी रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. (स्थानिक शेतकऱ्यांनी केली मदत) कधी न थांबणारी रेल्वे अचानक थांबली असुन रेल्वेच्या इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपासच्या शेतकरी विश्वनाथ देशमुख, किशोर देशमुख, रामचंद्र चव्हाण, गणेश लाळे, अमृत देशमुख, प्रदीप गायकवाड, दादासाहेब वाघमोडे, सोमा बनसोडे, आनंद गुंड, राहुल गायकवाड, दिनेश गायकवाड आदींनी रेल्वेकडे धाव घेत आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अतिशय कठीण प्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाबद्धल घाटण्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गावकरी व आसपासच्या नागरिकांचे आभार मानले.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगलोरहुन कन्याकुमारीकडे निघालेल्या के. के. एक्सप्रेसने मोहोळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर घाटणे गावाजवळ रेल्वेचे इंजिन पेटल्याचे रेल्वे चालक विकासकुमार याच्या लक्षात आले. तात्काळ रेल्वेचालक विकास कुमार यांने अतिशय धाडसाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करीत पहिल्यांदा गाडी बंद केली. पहिल्यांदा रेल्वे थांबविली व गाडी थांबल्यानंतर रेल्वे इंजिनमधून खाली उडी मारली. या प्रयत्नामध्ये रेल्वेचालक आगीने होरपळला असुन गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे चालकास रेल्वेतील पोलिस कर्मचार्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी मोहोळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूरला रवाना केले आहे.