वेळापूर – वेळापूर येथील संकल्प स्पोर्ट्स शूटिंग क्लब चा विद्यार्थी व तांदुळवाडी तालुका माळशिरस येथील रहिवासी विजय सुखदेव मोकळे याने
देहरादून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ६ व्या झोनल पॅरा शूटिंग स्पर्धा २०२६ मध्ये ज्युनिअर आणि सिनियर दोन्ही गटात आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत २ सुवर्ण पदक पटकावले असून त्याची निवड दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी झाली आहे.
विजय मोकळे याला शूटिंग राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय राऊत याचे मार्गदर्शन लाभले. मोकळे याने घघघवीत यश संपादन केल्याबद्दल त्याचे आमदार उत्तमराव जानकर , माजी जि प सदस्य सतीशराव माने देशमुख, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अॅड. नागेशराव काकडे, माजी उपसरपंच शशिकांत कदम, माजी व्हाईस चेअरमन उदय राजगुडे, तेजस जाधव, माजी सरपंच हणमंतराव साळुंखे, सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे, माजी उपसरपंच शंकरराव काकुळे,माजी उपसरपंच जावेद मुलाणी, प्राचार्य आर बी पवार संजय देशपांडे अॅड.दत्तात्रय राऊत , भागवत गायकवाड , क्रिडाशिक्षक सतीश कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


















