सोलापूर – ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 निमित्त मुस्ती येथे आयोजित भव्य जंगी कुस्त्यांनी संपूर्ण परिसरात उत्साहाची लाट उसळवली. आखाडा प्रेक्षकांनी खचाखच भरला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात पार पडलेल्या या कुस्त्या मुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होण्यासारख्या ठरल्या. या सोहळ्याला मान्यवर उपस्थिती लाभली असून, “बाजार समिती उपसभापती सुनील कळके, गड्डू अण्णा पटणे बोरामणी,
माजी सरपंच नागराज पाटील विद्यमान सरपंच बालाजी जमादार उपसरपंच हरी शिंदे ,भाजपा मंडळ अध्यक्ष महादेव पाटील, देवराज बिराजदार ,शैलेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गौतम चौधरी पोलीस पाटील रजनीकांत मेहता, रमेश चव्हाण,सुरेश चव्हाण , यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कुस्त्यांचा आनंद घेतला
मुख्य लढतीत योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी) विरुद्ध फेडरेला लिमा (ब्राझील) असा दमदार सामना रंगला आणि योगेश पवार विजयी ठरले. त्यानंतर नवीन कुमार (हिमाचल प्रदेश) व देवा थापा (नेपाळ) यांच्यातील लढत प्रचंड रंगली; देवा थापा यांनी आक्रमक डावपेचांनी विजय मिळवला. ₹५,००० ते ₹२,५१,००० पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या, ज्यातून या सोहळ्याचे भव्यत्व स्पष्ट झाले.
या संपूर्ण कुस्ती सोहळ्याची संकल्पना व नियोजन माजी सभापती भीमाशंकर जमादार आणि माजी सभापती कल्याणराव पाटील यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले. आखाड्याची मांडणी, पैलवानांचे स्वागत, प्रेक्षकांची व्यवस्था, वेळेचे काटेकोर नियोजन आणि संपूर्ण कार्यक्रमाची सुसूत्रता यामध्ये त्यांच्या अनुभवाचा ठसा स्पष्ट जाणवला. परंपरेचा मान राखत आधुनिक नियोजनाची जोड देत त्यांनी हा सोहळा आदर्शवत उभा केला.
या कुस्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धाराशिव येथील गोविंद घाडगे आणि मुस्ती येथील अशोक कस्तुरे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष भीमाशंकर चौधरी व समस्त ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमामुळे हा कुस्ती सोहळा अत्यंत यशस्वीरिता पार पडला नुसती मध्ये यापूर्वी कधीही न झालेले आहेत त्या भव्य दर्जेदार आणि रोमांचक कुस्त्या यंदा अनुभवाला मिळाल्या.

























