अक्कलकोट – तालुक्यातील मिरजगी येथील ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रा महोत्सव १० जानेवारी पासून दीपोत्सवाने सुरुवात करण्यात आले असून १४ जानेवारी पर्यंत पाच दिवस विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यांची माहिती श्री सिध्दरामेश्वर देवस्थान पंच कमिटी सदस्य हावण्णा रामकृष्ण निंबाळ यांनी दिली आहे.
मंगळवार दि.१३ रोजी दिवसभर भक्ताचे घरापासून देवास्थान पर्यंत साष्टांग दंडवत घालून नवस फेडण्याचे कार्यक्रम होईल. रात्री आठ वाजता देवस्थान आवती भवती श्रीचे पालखी प्रदक्षिणा आणि शस्त्र चढविण्याचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजता मातू बिद्दीतू मौन गेद्दीतू या सुंदर सामाजिक कन्नड नाटकाचे प्रयोग सादर होणार असल्यांची माहिती श्री सिध्दरामेश्वर देवस्थान पंच कमिटी सदस्य राम अमसिद्ध पाटील यांनी दिली आहे.
बुधुवार दि.१४ रोजी पहाटे श्रीचे महाभिषेक पूजा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता महादेव निंबाळ लिखित श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज चरित्रामृत मिरजगी या पुस्तकाचे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान अध्यक्ष तथा नूतन नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थित सोलापूर वालचंद महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या शुभ हस्ते प्रकाशन कार्यक्रम होणार आहे. दिवसभर नवस फेडण्याचे कार्यक्रम होईल. देवास्थान समोरील होम यज्ञाचा शुभारंभ संजय देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.रात्री ११ वाजता प्रसिध्द कन्नड नाटकाचे प्रयोग सादर होणार आहे.तरी भाविक भक्तांनी श्रीचे दर्शन आणि महाप्रसादचे लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिध्दरामेश्वर देवस्थान पंच कमिटी सदस्य मलकारी यलप्पा निंबाळ आणि बंडप्पा सिद्धप्पा निंबाळ यांनी केला आहे.
श्रीचे पालखी भेटी व अक्षता सोहळा
बुधवार दि.१४ रोजी सायंकाळी पाच वाजता मिरजगी येथील बोरो नदी पात्रातील (पाटबंधारे) जवळ बासलेगावं मिरजगी आणि गळोरगी या तिन्ही गावातून श्री सिध्दरामेश्वर पालखीचे गंगास्नान येतात आणि बसवण कट्टयाजवळ दिवस मावळण्याचा सुमारास या तिन्ही श्रीचे पालखी भेटीचे कार्यक्रम मोठया उत्सहात साजरी करण्यात येणार आहे .येथून या तिन्ही गावातील श्रीचे पालखी मिरजगी येथील श्री सिध्दरामेश्वर मंदिरा पर्यंत नंदीध्वजसह विविध वाद्यवृंदासह शोभेचे दारुकामचे आतेशबाजी करीत परंपरा प्रमाणे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री हनुमान मंदिराजवळ नंदीध्वजास फुल चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. पुरंवत स्वामीचे शस्त्र खेळण्याचे कार्यक्रम होणार असून रात्री आठ वाजता अक्षता सोहळा कार्यक्रम होणार आहे.
– सौ रकमाबाई लक्ष्मण निंबाळ, सरपंच ग्रामपंचायत मिरजगी


















