भोकरदन :भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ ते आडगांव रस्त्यावरील चव्हाणी पांदी ते बाळदगड या दीड किलोमीटर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी दोन वर्षापुर्वी लोकवर्गणी जमा करुन तसेच लोकसहभागातुन रस्त्याचे काम केलेले होते. माञ गावातील कंञाटदार व अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेचे काम दाखवुन आतापर्यत लाखो रुपये काढले असुन रोजगार हमीच्या योजनेवरच डल्ला मारला असल्याने या रस्त्यांची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
जळगाव सपकाळ ते आडगांव या दिड किलोमिटर पादंण रस्त्यासाठी २४ लाख रुपये खडीकरणासाठी रोजगार हमी योजनेतुन मंजुर आहे माञ या रस्त्याचे काम झाले नसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करुन लोकसहभागातुन रस्त्याचे काम केले होते माञ आता संबधीत कंञाटदार व रोजगार हमीच्या अधिकाऱ्यांनी मिळुन रस्त्याचे काम नकरताच शासनाचे लाखो रुपये गडप करुन “रोजगार हमी अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही” या म्हणी प्रमाणे या रस्त्याच्या पैशावर डल्ला मारला आहे
याविषयी येथील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी संबधीत अधिकारी तसेच भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कळविले होते माञ त्यांनी उडवा उडविचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली माञ आता सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्याचे बेहाल होऊन रस्त्यावरील नळकांडी पुल खचल्याने रहदारी बंद झाली आहे तसेच रोजगार हमी योजनेतुन रस्त्याचे कामच नझाल्याने रस्त्यावर चिखल झाल्याने रहदारी करतांना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे
त्यामुळे या रस्त्याची तात्काळ रोजगार हमी योजनेतुन दुरुस्ती करुन रस्ता सुरळीत करावा तसेच रोजगार हमी योजनेच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी डॉ. शालीकराम सपकाळ, गणेश मुठे, प्रशांत बुरुकुले, अनिल सपकाळ, रविंद्र सपकाळ, शुभम सपकाळ, संभाजी सपकाळ, रामधन मेहर, उध्दव मुठे यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
सोमवारी रोजी जोरदार झालेल्या पावसांमुळे या रस्त्यावरील नळकांडी पुल खचला असल्याने रहदारीसाठी रस्ता बंद झाला आहे. या रस्त्याचे रोजगार हमी योजनेतुन काम न झाल्याने शेतातील पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने चिखल झाला असल्याने रहदारीसाठी अडचणणिचां शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.