परतूर : तालुक्यातील मसला
येथील अशोक संतोष गुंजमूर्ती (३०) याने स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन
आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २३) रोजी उघडकीस आली आहे. अशोक गुंजमूर्ती हा गेल्या काहीं दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्याच्याकडे काही खासगी कर्ज असल्याचे प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून मिळाली. शेतातून घरी परत न आल्याने नातेवाईक यांनी शोध घेतला असता मिळून न आल्याने शेतातली विहिरीत पाहिले
असता आत्महत्या केल्याचे लक्षात आले. बीट जमादार इस्माईल शेख, पोकाँ परमेश्वर माने यांनी घटनेचा पंचनामा केला. मयत अशोक गुंजमूर्ती यांच्या पश्चात पत्नी, दोन अपत्य आहेत. त्याच्या भाऊ लक्ष्मण गुंजमूर्ती यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार इस्माईल शेख हे करीत आहेत.