धाराशिव – वाशी तालुक्यातील हायवे रोडवर भर दिवसा म्हणजेच दीड वाजता पवनचक्कीचे पाते वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक रोडवर क्रॉसिंग करत असताना अडकला तासभर वाहतूक ठप्प, पवनचक्की ला शासकीय नियमानुसार संध्याकाळी नऊच्या पुढे व सकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी दिलेली असून त्याची पायमल्ली करून भर दिवसा वाहतूक चालू आहे.
वाशी तालुक्यात पवनचक्की ची मनमानी व शेतकऱ्यांना होणारा त्रास हा चव्हाट्यावर विषय आला असून याकडे कोणाचेही लक्ष नाही ,कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय नियम ह्यांच्या पुढे हतबल झाले की काय असा मोठा प्रश्न दिसून येत आहे.
दिवसा न वाहतूक करणे हा शासकीय नियम असून हा नियम धाब्यावर बसविण्याचे काम पवनचक्की वाले सध्या करीत आहेत याचा प्रत्यय वाशी तालुक्यातील वायरलेस ह्या क्रॉसिंग सेंटरला आज दुपारी दीड वाजता दिसून आला भले मोठे पाते घेऊन जाणारा ट्रक टर्न घेत असताना रोडवरच आडवा उभा राहिला त्यामुळे हायवे क्रमांक 5 2 एक तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प राहिली.























