वाळूज महानगर (प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहती मधील
सिडको परिसरात दिवसेंदिवस नागरी समस्यांमध्ये वाढ होत असून परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. परंतु सिडको प्रशासन या नागरिक समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिडको प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे
बजाजनगर मार्गे वडगाव( को ) कडे जाणार रस्ता हा कित्येक वर्षे पूर्ण पणे खराब झालेला आहे. या रस्त्यावर पाच पाच फूट लांबीचे व एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाचे पाणी तुंबून पाण्याच्या अंदाज न आल्याने रोज अपघात होत आहेत. यापूर्वी देखील या विषयावर परिसरातील विविध रहिवाशी, सामाजिक संघटना , राजकिय पक्षाच्या वतीने सिडको प्रशासनाला निवेदने दिली आहेत परंतु नेहमी आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम सिडकोने केले आहे. येथे आठ दिवसात येथील नागरी समस्यावर उपयोजना न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. दिलेल्या निवेदनामध्ये खालीलप्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
सिडको वाळूज महानगर 1 मध्ये पाण्याची टाकी, मराठा चौक, महाराणा प्रताप चौक, महाविरनगर ओपन पेज 1,2 ,सारा गौरव चौक , अहिल्याबाई होळकर चौक, सिडको गार्डन, येथे हाय मास्ट लॅम्प बसवण्यात यावे , सिडको महानगर 1,2,मध्ये पाण्याचे नियोजन करावे , औषध फवारणी व धुर फवारणी सात आठ महिन्यांपासून होत नाही ती आठ दिवसांत दोनदा करण्यात यावी नसता शिवसेना स्टाईल आंदोलन करून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. यावेळी अभियंता कपिल राजपूत, सहाय्यक कार्यकारी अभियंता उदयराज चौधरी यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले आहे . निवेदनावर उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, बजाजनगर उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे, ह.भ.प. तथा उद्योजक बबन चौरे महाराज,अक्षय तृतीया सोसायटी चेअरमन अंबादास गुंजाळ, सत्यणारायन गग़ड, यशवंत चौधरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.