माळशिरस – येथील विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अड.मिलिंद कुलकर्णी ,जनरल सेक्रेटरी रामभाऊ दोशी,मानसी कुलकर्णी ,प्राचार्या अपर्णा कुलकर्णी,श्रीरंग तरडे,धनंजय मस्केधोंडीराम मस्के,नामदेव पाटील,बाजीराव पिसे,नंदकुमार घाडगे,यांच्यासह शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
काठी न घोंगडे घेऊ द्या की,मला बी जत्रेला येऊ द्या या पारंपारिक गाण्यासह नवीन गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करूनसर्वांची मने जिंकली,आपल्या पाल्याचे नृत्य पाहण्यासाठी व त्यांचे फोटो काढण्यामध्ये पालक व्यस्त होते.लहान मुलासह ,मोठ्या मुलाणी सादर केलेल्या सादरीकरणास सर्वांनी दाद दिली ..


























