सोलापूर – महान समाजसुधारक, स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांना विश्व हिंदू परिषद तर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली.
सुपर मार्केट, सोलापूर येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष प्राचार्य श्री गजानन धरणे, जिल्हा अध्यक्ष श्री विष्णुजी मोंढे, उपाध्यक्ष श्री केदारजी पाटील, विभाग मंत्री श्री विजयकुमार पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षण आणि सामाजिक विषमते विरुद्धच्या त्यांच्या लढाऊ कार्याचे स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी विभाग सह मंत्री श्री संजयकुमार जमादार, प्रांत धर्माचार्य सह संपर्क प्रमुख श्री नागनाथ अण्णा बोंगरगे, श्री अमित सारोळकर, श्री चन्नबसवेश्वर सोलापुरे, समरसता आयाम प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी, राजाभाऊ माने, प्रवीण कांबळे उपस्थित होते.
























