विश्व पब्लिक स्कूलमध्ये आषाढी उत्सव उत्साहात साजरा…
पर्यावरण दिंडी काढून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश..
देगलूर-
एक उपक्रमशील, नाविन्यपूर्ण व आनंददायी शिक्षण देणारी शाळा म्हणून अत्यंत कमी काळात नावारूपास आलेल्या विश्व पब्लिक स्कूल देगलूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांचे अभंग, भक्ती गीते सादर केली. तसेच या भक्ती गीतावर नृत्यही सादर करण्यात आले. शिक्षणतज्ञ एच. एस. खंडागळे सर व कैलास येसगे कावळगावकर यांनी वारकरी संप्रदायातील विविध संतांची माहिती व त्यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ, विना, मृदंग व घोषणांच्या निनादात व अत्यंत उत्साहात दिंडी काढली. यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा असे संदेश देणारे फलक हातात घेतले होते.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या संचालिका आम्रपाली येसगे, स्वाती मनधरणे, संतोष नागपुरे, श्रीकांत कोनुले, शकुंतला कांबळे, जयश्री शिंदे, अश्विनी रावळकर, अवंतिका गंदपवार, अनिता शिरामणे, किरण माळगे, सिंधू येरापल्ले, ममता साबणे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.