तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासह विविध मागास समाजाच्या संदर्भात संवाद बैठकीचे आयोजन राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीचे निमंत्रण नांदेड वसरणी येथील आदिवासी जमातीतील कोळी महादेव समाजाचे सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक तथा भाजपा नांदेडचे अनुसूचित जमाती मोर्चा महानगर अध्यक्ष विश्वनाथ नामदेव जटाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते .
भारतीय जनता पार्टी व संघाच्यावतीने भारतातील विविध जमातीतील मागास प्रवर्गातील विविध समस्यांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून विविध जाती-धर्मातील शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उच्चतम पदावरून कार्य करणारे व सेवानिवृत्त झालेले पदाधिकारी, अधिकारी यांना गोपनीय पत्र पाठवून राष्ट्रपती भवन दिल्ली येथे बोलवण्यात आले होते. सदरील बैठकीत समाजातील वंचितांच्या गरजा जाणून घेऊन त्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारकडे पाठवाव्यात तळागाळातील समाजापर्यंत हे सरकार पोहोचले पाहिजे.
महाराष्ट्रातून ४० लोकांचे दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संवाद बैठक दिनांक २१ जुलै २०२५ रोजी घेण्यात आली . या बैठकीला नांदेड येथील वसरणीचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक विश्वनाथ जटाळे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा या बैठकीत आपल्या समाजातील काही समस्या राष्ट्रपती यांच्याकडे मांडण्यात आल्या.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी होणारी नागरिक, पालक व विध्यार्थी यांची हेळसांड तात्काळ सोडविण्याची मागणी आयोजित संवाद बैठकीत सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक तथा भाजपा नांदेडचे अनुसूचित जमाती मोर्चा महानगर अध्यक्ष विश्वनाथ नामदेव जटाळे यांनी केली.यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री जे.एल.ऊराव, राज्यमंत्री दुर्गादास ऊईके,भाजपा जनजाती मोर्चा अध्यक्ष खा.समीर ओराव, महाराष्ट्र जिल्हा संघटन मंत्री किशोर काळकर, महामंत्री प्रकाश गेडाम, सुदर्शन शिंदे,राजश्री काळे, रमेश मावसकर यांच्यी उपस्थिती होती. राष्ट्रपती यांनी प्रथमच नवी दिल्ली येथे बोलवल्या या आदिवासी समाजाच्या प्रश्ना बाबत घेतलेल्या आढावा संदर्भ संवाद बैठकी मुळे जात वैधता प्रश्नासह आनेक प्रश्न मार्गी लागतील.
सदरील बैठकी नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू समवेत स्नेह भोजनाचा अनोखा आनंद मिळाला. सगळी अधिकारी हे गरिबी परिस्थिती जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन उच्चतम पदावर गेलेल्या पदाधिकाऱ्यांना समाजाची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टी व संघाच्या वतीने आम्हाला मिळाली.
सरकारने दिलेली जबाबदारी आम्ही निपक्ष पार पाडू दिलेल्या संधीचे सोने करून शासनाच्या विविध योजना तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू असे मत सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक विश्वनाथ जटाळ यांनी व्यक्त केले.