वेळापूर – माळशिरस तालुक्यात सामाजिक सलोखा व विकासात्मक विचारांना चालना देणारी एक महत्त्वपूर्ण सद्धीच्छा भेट नुकतीच पार पडली. जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे नेते तसेच कुस्तीगिर परिषद कार्याध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या वेळापूर येथील “संविधान” निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीत माळशिरस तालुक्यातील विकासकामे, सामाजिक प्रश्न, युवकांचे प्रश्न, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या अडचणी तसेच जनहिताशी निगडित विविध विषयांवर सखोल, सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली. तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी परस्पर सहकार्य व समन्वयाने काम करण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे, सुधीर रास्ते, युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे, संपर्क प्रमुख अण्णासॊ भोसले, अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे ,उमेश (बॉबी)वाघमारे, नवनाथ साठे, स्वप्नील सरवदे, संतोष बनसोडे, मयूर माने, गणेश साठे, असिफ शेख, भारत साठे, गौतम भंडारे, सुनील ओवाळ,
ओंकार सरतापे, विश्वतेज सरतापे, मीनाक्षी सरतापे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————
ही भेट तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्वासक ठरणार असून, लोकहिताच्या कार्यासाठी एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी आगामी निवडणुकीबाबत एकत्र लढण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.
—: मिलिंद सरतापे तालुका अध्यक्ष आरपीआय.


















