सोलापूर – महानगरपालिका मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै. लक्ष्मण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रमसाठी त्याच्या पंचकन्या मनीषा , उषा ,शिल्पा , स्वाती व आरती पाटील यांच्या माध्यमातून गेली २ वर्षे विद्यार्थी उपयुक्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आतापर्यंत स्टडी टेबल , शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थी वर्गाचे युनिफोर्म भेट म्हणून दिलेले आहे. कै. लक्ष्मण पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम राबवीत असल्याचे त्यांची कन्या स्वाती पाटील यांनी सांगितले. महानगरपालिका शाळामध्ये गरजू विद्यार्थी वर्गासाठी अश्या विविध उपक्रमासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे उपक्रमाचे समन्वयक प्रा. विक्रमसिंह बायस यांनी आपल्या मनोगतात सांगितले. १५ हजार रुपयाच्या किमतीचे २ ढोल ,२ ड्रम ,२ खंजिरी , २ त्रिकोण , २ झांज तसेच २० लेझीम असे कवायत साहित्य शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापिका रेहाना नदाफ यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रंचालन अप्पासाहेब ककमारे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुरेश सरगम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र दंतकाळे , राहुल नवले ,धोंडू केंगळे , गंगा कांबळे , गजाला शेख ,रंजना गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

























