पूर्णा / परभणी – पूर्णा नगरपालिकेच्या निवडणूक साठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षक सविता चौधर यांनी १७ नोव्हेंबर सोमवार रोजी पूर्णा तहसील कार्यालयात भेट देऊन निवडणुकीचा कामाचा आढावा घेतला.
पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी च्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्णा नगर पालिका निवडणुकीसाठी जालना येथील उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांची पूर्णा नगरपालिकेचे निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली असून त्यांनी सोमवारी पूर्णा तहसील कार्यालयात भेट देऊन निवडणुकीच्या कामकाजाचे पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, गटविकास विकास अधिकारी नारायण मिसाळ, मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे उपस्थित होते तसेच त्यांनी शहरातील विविध विविध ठिकाणी नेमण्यात आलेल्या तपासणी पथकास भेट देऊन पाहणी केली.



















