माढा – तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिरास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सावता महाराजांची विहीर, मंदिर तसेच शेती याबाबत सविस्तर माहिती घेतली.
समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी या ओवीतून सावता महाराजांनी कर्मातून ईश्वराची पूजा करण्याचा जो संदेश दिला, त्याची अनुभूती आज समाधीच्या दर्शनाने झाली. असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
या प्रसंगी संत सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर, प्रभु महाराज माळी, सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.अरण येथील संत शिरोमणी सावता महाराज समाधी स्थळ हे भक्ती आणि श्रध्देचे केंद्र असून, हजारो भक्त येथे दर्शनासाठी येत असतात.




















